प्रीती मराठी प्रेम कविता Marathi Prem Kavita

सौ. प्रिती सुरज भालेराव यांनी लिहलेली कविता प्रीती या कविता मध्ये कवियत्रीने प्रेम भाव व्यक्त केला आहे.

प्रीती मराठी प्रेम कविता  Marathi Prem Kavita

आयुष्याचं कोडं आज नव्यानेच उलघडलं
तुझ्यामुळेच आयुष्याचं गणित मला समजलं

तुझ्या भेटीची ओढ मला आता लागली
तुझ्या प्रेमाची प्रीती माझ्या मनामध्ये जागली

आपल्या या कोमल नात्याला काय नाव द्यावं
मला वाटतं तुच तुझ्या मनाने ते समजून घ्यावं

तुझ्या प्रत्येक गोष्टींचा फरक माझ्यावर नक्कीच पडतो
नकळत मग एकांतात माझा जीव तुझ्यासाठी रडतो

तुझ्या आयुष्यातील सगळं दुःख मला देशील का?
सांग तू पुन्हा एकदा नव्याने माझा होशील का?

कितीही प्रेम असलं तुझ्यावर तर ते मी सांगू नाही शकणार
प्रत्यक्षात नसले तरी लांब राहूनही मी तुझ्यासोबत असणार

माझ्या जिवापेक्षा कायमच मी तुला जास्त जपणार
काहीही झालं तर तुझी साथ कधीच नाही सोडणार

सौ. प्रिती सुरज भालेराव, पुणे