खऱ्या प्रेमाचा सुगंध
नाही कधीच लपत
स्पर्श मनाशी मनाचा
नाही अंतर उरत
कोणी दूर असूनही
खूप जवळ असतं
कोणी जवळ असूनही
कधी जवळ नसतं
प्रेम असतं सुंदर
त्याला जपावं लागतं
ओल्या मनाच्या मातीत
प्रेम रुजवावं लागतं
श्रावणाची रिमझिम
पावसाची रिमझिम
हळुवार वाऱ्याचा स्पर्श
हिरवळ श्रावणाची
श्रावणाचा महिना
प्रेम वाहणारा झरा
उन्हातून चालताना
प्रेम हळुवार वारा
पुनम सुलाने, जालना