शब्दातून हा आगळावेगळा
भरवला जातो प्रेमाचा गुलकंद,
नवनवीन उपक्रमातून रोज
जोपासला जातोय छंद...
समाजाचे लागते काही देणे
हिच जगते ठेवून मनात आशा,
धरते धारदार लेखणी हाती
समाजाला दाखवते नवी दिशा...
रोजच्या वाचनातून मिळते
प्रगतीची एक नवी वाट,
मनसोक्त फुलते ही
काव्य फुलांची पहाट...
प्रेमळ शब्दातून येथे
होतात मनातील भाव व्यक्त,
काव्य पंढरीचे आम्ही वारकरी
साक्षात लिखाणाचे भक्त...
प्रेमाचा गुलकंद भरवते
शाब्दिक आधार देऊन,
आपलेपणाचा उमटवते ठसा
एक कवयित्री होवून...
कावेरी आबासाहेब गायके,
भिवगाव, ता. वैजापूर,
जि. औरंगाबाद.