शब्दांनी व्यक्त झाले सारे,
समजावलेलेही समजत नाही,
प्रेम हे जडलेे की जडतेच,
मनाला या रोखू शकत नाही...
वाग तू कसेही अन् बोलही,
आठवते जूने क्षण हरेक ते,
विसरूनी जाशील मला कधी,
मी विसरेल सरणावरच प्रेम ते...
पाहते वळूनी वळूनी मागे,
दिसशील तसा वळणात,
मागणी घालणारा प्रेमाची,
ऊभा जसा येऊनी पुढ्यात...
बदलला रूतू सम तू ही,
वर्षाव प्रेमाचा हेतू निराळा,
बहरला गुलाब बागेत हा,
रंग मनासारखा त्या काळा...
कोरडी झाली मनाची धरा,
गाळ आठवांचा नेत्रांत कायम,
आहेत प्रेमाची माणसं काही,
म्हणून जगतीये राखूनी संयम...
दिपल (पल्लवी वायदंडे) पुणे