थांबले रे मी,तू थांब जरासा

अरुण वि.देशपांडे लिखित मराठी कविता थांबले रे मी,तू थांब जरासा

थांबले रे मी,तू थांब जरासा

थांबले रे मी ,तू थांब जरासा
असा कसा रे तू राजसा

आल्या आल्या जाऊ नको असा
बरे नाही रुसणे तुझे असे  
बघ हसुनी माझ्याकडे जरासा
थांबले रे मी ,तू थांब जरासा

आहेस तू जसा,नाही रे मी तशी
प्रेमात तुझ्या झाले वेडीपिशी
दे ना रे वेळ तुझा थोडासा
थांबले रे मी, तू थांब जरासा

जनांची भीती आहे जशी तुला
काटेरी वाट चालणे आहे मला
कर विचार रे जरा माझ्या फुला
असा कसा रे तू राजसा
थांबले रे मी, तू थांब जरासा

तू अप्राप्य मज एक स्वप्न जसा
तरी आहेस माझा, हाच दिलासा
आल्या आल्या जाऊ नकोस असा
असा कसा रे तू राजसा
थांबले मी ,तू थांब जरासा

Arun Deshpande

अरुण वि.देशपांडे-पुणे
9850177342