आतुर झालेल्या सखीला भेटाया
अधूनमधून केव्हाही, कधीही
वरुणराजा ढगातून कोसळतोय
आता रिमझिम पावसाचा
खरा Feel येतोय...
हिरवाईनं धरणी सजली
डोंगरही झाले हिरवेगार
वाटा भिजल्या, रस्ते भिजले
ओलेत्या सखीला आता प्रेमाचा
खरा Feel येतोय....
अंगणात रांगोळी वेली अन् फुलांची
दारात सजली पाऊले महालक्ष्मीची
लाडू, करंज्याचा सुवास येतोय
आता मंगल सण-उत्सवांचा
खरा Feel येतोय....
काळजी घेऊन झाली सगळी
मनात आहे चिंता आरोग्याची
तिसऱ्या लाटेचा बागुलबुवा येतोय....
पण...
पण...
खरं सांगायचं तर...
हिंमत अन् आत्मविश्वासानं
लढण्याचा... जगण्याचा... जिंकण्याचा...
आताच खरा Feel येतोय...!!!
संदीप प्रभाकर कुलकर्णी, औरंगाबाद.
मो. क्र. ९८५०८२६६७९.