चुकत असेल माझं काही,
मनमोकळेपणे सांगशील का?
अल्लड वेडी प्रीत ही माझी,
सख्या तू समजून घेशील का?
आग तू होशील जेव्हा,
पाणी मी नक्कीच होणार.
काहीही झालं आयुष्यात,
तुला सोडून नाही जाणार।।
बंध हे आपले प्रेमाचे,
अजून घट्ट करशील ना!
सांग ना रे सख्या माझ्या,
पुन्हा तू प्रेम करशील ना!
माझ्या मनातले ते कोमल भाव,
सख्या तूच समजून घ्यावे.
मला नाही कळत या नात्याला ,
आपण काय नाव द्यावे।।
माझ्याकडून होतात चुका,
अलगद् पाणी घालशील ना!
खूप काही नकोय मला,
आयुष्यभर साथ देशील ना!
आयुष्याची वाटचाल,
आपण दोघांनी करायची.
कितीही संकटे आली ना,
अलगद्पणे ती पेलायची।।
एकमेकांच्या साथीने आपण,
आयुष्य फुलवत जाऊया.
कठीण प्रसंगात एकमेकांचा,
हातात हात घट्ट पकडून ठेवूया।।
तुझी साथ हवी आहे मला,
बाकी काही नाही सांगणे.
सुखी ठेवावं देवाने तुला,
फक्त हेच आहे मागणे।।
सौ. प्रिती भालेराव, पुणे