तुझी आठवण माझ्या
मनातून काही जाईना
काही केल्या मी आज
तुला काही विसरेना
प्रत्येक मिनिटाला मला
तुझीच काळजी वाटते
कसं सांगू मनात माझ्या
तुझीच आठवण दाटते
दुर असूनही तू माझ्या
जवळच मला भासतो
पाहताच डोळे उघडून
तू माझ्यासमोर नसतो
काय सांगू तुला सख्या
माझ्या मनाची अवस्था
माझ्या वेड्या मनात या
तुझ्याबद्दल किती आस्था
तुझं अध्यात्म आणि प्रेम
मला खूप काही शिकवतं
प्रेम म्हणजे नक्की काय
ओठांवर नाव तुझच येतं
प्रेम कसं असतं ते मी
तुझ्याकडूनच शिकले
खरं प्रेम काय हे मी तर
पहिल्यांदाच अनुभवले
सौ. प्रिती भालेराव, पुणे