प्रेम म्हणजे काय Marathi Prem Kavita

पूनम सुलाने लिखित मराठी कविता प्रेम म्हणजे काय?

प्रेम म्हणजे काय Marathi Prem Kavita

प्रेम म्हणजे काय
विचारावं सागरतळी
 दडलेल्या त्या मोत्यांना

प्रेम म्हणजे काय
विचारावं श्रावणसरित न्हाऊन
नववधू परी नटलेल्या सृष्टीस

हो खरं प्रेम काय असतं
ते विचारावं सागर मिलनास
 व्याकुळ झालेल्या सरितेस

प्रेम नेमकं असतं तरी काय
 ते विचारावं नकळतपणे 
पानाआड उमललेल्या त्या कळीस

विचारावं प्रेम काय असतं
काळोखातून लख्ख प्रकाशाकडे
नेणाऱ्या त्या सुंदर पहाटेस

नेमकं प्रेम काय असतं
विचाराव ओसाड माळरानावर एकटाच 
थाटात उभा राहिलेल्या त्या काटेरी झुडपास 

प्रेम म्हणजे फक्त प्रेम असतं
 सृष्टीच्या प्रत्येक चराचरात 
प्रेमाचं अस्तित्व असतं

मात्र खरं प्रेम समजण्यासाठी
फक्त एक सुंदर ,निर्मळ,पवित्र मन लागतं

poonam-sulane

पूनम सुलाने
हैदराबाद