आजकाल घटस्फोट हा Trend होत चाललाय का?

आज बाजारात येणाऱ्या नवीन कपड्यांच्या हव्यासापोटी चांगले कपडे बदलले जातात. मग माणसांचीही तीच गत व्हावी का?

आजकाल घटस्फोट हा Trend होत चाललाय का?

Divorce, तलाक, फारकती हे शब्द जरी वेगळे असले तरी त्यांचा अर्थ मात्र एकच, एकमेकांपासून दूर होणे... जे नाते सर्वांच्या, देवदेवतांच्या संमतीने जोडले जाते ते आज एवढ्या सहजतेने तोडल्याही जात आहे. अशी परिस्थिती का यावी कुणावर? याला कारणीभूत कोण?

आज बाजारात येणाऱ्या नवीन कपड्यांच्या हव्यासापोटी चांगले कपडे बदलले जातात. मग माणसांचीही तीच गत व्हावी का? पूर्वी कपडा जुना झाला, त्याला ठिगळ लावले जायचे, कसला डाग असला तरी तो माझाच आहे, असे म्हणून शेवटपर्यंत वापरल्या जात होता. मग आज माणसे कशी एवढ्या सहजतेने सोडली जातात. एवढं सोप्प असतं का हे नातं तोडणं... हे नातं तोडायची वेळ का यावी? नातं परत जोडण्यासाठी दोन धाग्याची टोकं एकत्र आल्याशिवाय गाठ बनत नाही. मग नात्यातील दोन्ही साथीदारांनी एकत्र येऊन, समजून घेण्याची गरज नाही का?
 
एका जनाने कितीही ताणून, खेचून घेतलं तरी जर दुसरा त्याची बाजू सोडायलाच तयार नसेल तर हे नातं टिकणार तरी कसं? परत जुळलही तरी यात तो गोडवा जिवंत राहील का? नाही राहु शकत. माणूस मरणानंतर जिवंत होऊ शकत नाही. तर हे माणसाचं मन तरी कसं एकदा एखाद्या व्यक्तीसाठी मरून गेलं तर परत जिवंत होईल. नाही होणार ना..! 

मग एकच पर्याय उरतो शेवटी आणि तो म्हणजे कायद्याने एका नियमांच्या चौकटीत आखून दिलेला divorce चा एक तक्ता...

Priyanka Tupe

कु. प्रियंका पंढरीनाथ तुपे,
बाभुळगाव, ता. वैजापूर 
जि. छत्रपती संभाजीनगर