पीएफ सदस्यांना 7 लाख रुपयांचा जीवन विमा विनामूल्य मिळणार...

जर कोणत्याही पीएफ कर्मचाऱ्याची सव्हिर्स मध्ये दुर्घटनावश मृत्यू झाला तर त्या व्यक्तीच्या नॉमिनी EDLI insurance चे पैसे मिळवण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लेम करू शकता

पीएफ सदस्यांना 7 लाख रुपयांचा जीवन विमा विनामूल्य मिळणार...

मित्रानो, प्रत्येक पीएफ मेम्बर ला मोफत जीवन बिमाचा पण लाभ मिळत असतो. त्याला EDLI इन्शुरन्स असे म्हणतात यासाठी कर्मचाऱ्याच्या खात्यावरून एक रुपया सुद्धा काटात नाही. पहिले या मध्ये कमीतकमी २ लाख रुपये आणि अधिक अधी ६ लाख रुपयाचा बिमा चा लाभ मिळत असे परंतु पीएफ मेंबर्स ला मोफत ७ लाख रुपयेचा जीवन बिमा मिळेल.

EDLI काय आहें ?
जर कोणत्याही पीएफ कर्मचाऱ्याची सव्हिर्स मध्ये दुर्घटनावश मृत्यू झाला तर त्या व्यक्तीच्या नॉमिनीस किंवा फॅमिली मेंबर्स ला EPFO तर्फे Employees Deposit Linked Insursnce नुसार मोबदला राशी दिली जाते त्याला EDLI असे म्हणतात.

वास्तविक प्रत्येक पीएफ सदस्याला 3 शासकीय योजनांचा लाभ मिळतोः -

1) ईपीएफ  2) ईपीएस  3) ईडीएलआय

EDLI इन्शुरन्स क्लेम कसा करावा ?
जर कोणत्याही पीएफ कर्मचाऱ्याची सव्हिर्स मध्ये दुर्घटनावश मृत्यू झाला तर त्या व्यक्तीच्या नॉमिनी EDLI insurance चे पैसे मिळवण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लेम करू शकता

EDLI इन्शुरन्स ऑनलाईन क्लेम कसा करावा ?
जर पीएफ सदस्याने युनिफाइड मेंबर पोर्टलवर त्याच्या / तिच्या UAN खात्यात नामनिर्देशित अर्ज दाखल केला असेल तर, UAN मेंबर पोर्टल वर "Death claim filing by beneficiary" या ऑपशन वर जाऊन फॉर्म २०, १० D आणि फॉर्म ५ सबमिट करून EDLI Insurance साठी ऑनलाईन क्लेम करू शकता.

EDLI इन्शुरन्स ऑफलाईन क्लेम कसा करावा ?
जर पीएफ मेंबर ने युनिफाइड मेंबर पोर्टलवर आपल्या UAN खात्यात नामनिर्देशित अर्ज दाखल केला नसेल तर, Death Case मध्ये नॉमिनी मार्फत EDLI Insurance चा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन क्लेम करता येत नाही अशा वेळेस नॉमिनी किंवा फॅमिली मेंबर ला पीएफ ऑफिस मध्ये जाऊन ऑफलाईन फॉर्म जमा करावा लागेल तसेच पीएफ कार्यालयात दिलेल्या मार्गदर्शक सूचना पाळाव्यात. अशा प्रकारे, आपण ऑफलाइन हक्क सांगून ईडली विमाची भरपाई रक्कम मिळवू शकतो

7 लाख रुपयांचा जीवन विमा
नामनिर्देशित व्यक्तीने विम्याची रक्कम मिळविल्याचा दावा केल्यानंतर, नॉमिनीला या सर्व ईडीएलआय योजनेचा लाभ होतो

PF amount : पीएफ मेंबर च्या PF खात्या मध्ये कर्मचारी शेयर तथा नियोक्ता शेयर ची जेवढी रकम जमा असेल , तेव्हडी रकम हि व्याजासोबत मिळेल.

EPS pension amount : जर पीएफ सदस्याने 10 वर्षाची नोकरी पूर्ण केली नसेल तर सेवेनुसार पेन्शनची रक्कम मिळेल. जर कर्मचार्‍याने 10 वर्षाची नोकरी पूर्ण केली असेल तर त्याला उमेदवाराला मासिक पेन्शन मिळेल.

EDLI insurance amount : किमान अडीच लाख रुपये आणि जास्तीत जास्त ७ लाख रुपये असले तरी हिशोबानुसार जे काही रक्कम निघेल ते नॉमिनीला दिले जाते.