निसर्गाने दिली देणगी

सौ. कावेरी दिलीप पगार लिखित मराठी कविता निसर्गाने दिली देणगी

निसर्गाने दिली देणगी

निसर्गाने दिली देणगी
हिरवळीत राहण्याची संधी
आनंद घ्यावा तरी किती 
ओठ्यावर झाडाची फांदी...

असेल जरी कितीही दुःख 
बघावा एखादे फुल किंवा वृक्ष
मन होईल आनंदी अन् प्रसन्न 
विसरून जाईल सर्व काही दुःख 

घर असो कितीही मोठे
झाड-वेली-विना ते छोटे
शितलरूपी छायेने
झाकावे सर्वांचे ओटे...

निसर्ग आहे आपल्या घरी
त्याची सेवा करू एक होवूनी
निश्चय करावा सर्वांनीच 
वृक्ष जगवा सर्व मिळूनी...

kaveri dilip pagar

सौ. कावेरी दिलीप पगार,
गोळवाडी, ता. वैजापूर