फुटतील पंख नवे,,शब्दांना
नव्या विश्वासाची नवी भरारी घेतांना
परतूनी भेटतील,, स्वप्न नवे
नव्या विश्वात नवे रंग भरताना
संपेल खेळ,, नियतीचा
नवा डाव पुन्हा मांडतांना
बळ नवे घेऊन,, येतील
क्षण आनंदाचे जीवनी येताना
खुलून येतील ,,रंग सारे
रंग नवे जीवनात भरतांना
दरवळेल सुगंध,, चौफेर
हळुवार कळी उमलताना
जुळतील सुर,, पुन्हा नव्याने
गीत आनंदाचे गाताना
हिरवा साज नवा ,,घेऊन येईल
पुन्हा श्रावण येताना
पानगळीच्या यातना,, विसरल्या जातील
नव्या फांदीला नवी पालवी फुटताना
नव्या शब्दांची,, नवी सुरुवात होईल
जुन्या शब्दांची जुनी आठवण विसरताना
पुनम सुलाने
हैदराबाद