स्वाभिमान जागला तुझा
संपल्या का तुझ्या व्यथा,
कर्तृत्ववान शब्दाचा अर्थ
समजे ऐकुनी तुझ्या कथा...
सावित्री, जिजाऊ, अहिल्या
रमाही तुझ्यात अवतरली,
भिन्नतेच्या भिंतीवर आज
फुले समानतेची फुलली...
सबला आज जरी तू
निभावतेस हर कर्तव्य,
आयुष्याच्या रणांगणी
आदर्श तुझा भव्य...
तूच या सृष्टीचा आधार
तुझ्याविना पडे अंधार,
तुझ्या विचारांच्या प्रकाशात
कुविचारांचा संहार...
तुझ्या ओठी फुलावी
सत्कार्याची गाथा,
आणि पुन्हा उत्तुंग झेपावी
तुझ्या कर्तुत्वाची कथा...
जया विनायक घुगे - मुंडे
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षिका
परळी वैजनाथ, बीड