अजिंक्य वल्ली

जया विनायक घुगे-मुंडे लिखित मराठी कविता अजिंक्य वल्ली...

अजिंक्य वल्ली

स्वाभिमानी, कार्यक्षमतेने
घेई स्वराज्याचा ध्यास ,
या मराठमोळ्या मातीसाठी
जी सर्वकाळ असे खास...

धन्य आम्ही पुत्र तिचे
आज महती तिची गातो,
या मातेची स्मृति निरंतर
हृदयातूनी जपतो...

राजमाता जिजाऊ एक
अजिंक्य वल्ली इथली,
चरणस्पर्शाने तिच्या
पावन माती जिथली...

शिवबाहिरा असा झळकला
जगी न त्यासम दूजा कोणी,
इतिहासाची पुनरावृत्ती या
ऐसी ना कधीही होणी...

अचंबित मन ऐकून होते
या मातेच्या कथा साहसी,
शतशत नमना कर जुळती
निःशब्द होऊनी सारे पाहसी.

Jaya ghuge munde

जया घुगे-मुंडे
जिल्हा परिषद शिक्षिका,गावंदरा
परळी(वै.),बीड