सत्याची कास धरणारा अवलिया

सत्याची कास धरणारा आणि असत्याचा बुरखा फाडणारा लेखक म्हणून बाबा चन्ने यांना मराठवाड्यात ओळखले जाते. बाबा फक्त सत्य लिहिणारे लेखक नसून सत्याचा त्यांच्या व्यक्तीमत्वावर खुप मोठा पगडा आहे.

सत्याची कास धरणारा अवलिया

रक्ताच्या नात्याला लाजवेल
असा छाया देणारा वृक्ष आहेस तू 
मोरपिसांच्या स्पर्शापरी... 
मनस्पर्शीनारा आहेस तू 

असत्याला भेदून सत्याची
प्रखरता चमकणारा आहेस तू
पाषाणात ही वात्सलेचा
पाझर फोडविणारा आहेस तू

अन्यायाच्या पायात नुपूर बांधून 
न्यायाचे सुर निनादनारा आहेस तू 
भ्रष्टाचार करणाऱ्या राक्षसाला
लेखणीने ठार करणारा राम आहेस तू 

विखुरलेल्या मनाला;
जोडणारा बांध आहेस तू 
समाजीतील अनेक द्रौपदींचा 
कर्तबगार बंधू कृष्ण आहेस तू...

आयुष्याला कंटाळणाऱ्या 
हिरमुसलेल्या मनांची उभारी आहेस तू  
शितल वाऱ्याच्या झोताची 
चैतन्य देणारी झुळूक आहेस तू...

Sarita Udhav Bhand

सौ. सरिता उध्दव भांड, पैठण