अपराजित राजे ते
छत्रपती शिवाजी महाराज
काय गावे गुणगान त्यांच्या
तलवारीला शौर्याचा साज.
शून्यातून निर्माण केले
त्यांनी स्वतःचे राज्य
घेऊनी गडामागूनी गड
स्थापिले हिंदवी स्वराज्य
राखण्या महाराष्ट्राची शान
झीजवला देह आपुला रात्रंदिन
केले पाणी स्वतःच्या रक्ताचे
तरीही जपलाआपला स्वाभिमान.
जिजाऊ तू होतीस त्यांची आई
थोर तुझे उपकार माऊली
पराक्रमाचे बीज देता देता
दिलीस त्यांना मायेची सावली.
न विसरणार महाराष्ट्र तुजला
न हा देश विसरेल तुला
दिले शौर्याचे दान तू आम्हा
राजा तुझा खूप अभिमान मला.
तूझ्या शौर्याचा, स्वाभिमानाचा
जगात दबदबा तुझ्या नावाचा
शिवबा, खरंच महान तू
अपराजित राजा भारत देशाचा
सौ . जयश्री अविनाश जगताप
सातारा