आली एकादशी! आषाढी वारीला!!
जाऊ पंढरीला! पायी पायी!!धृ!!
झुळझुळ पाणी! चंद्रभागा वाहे!!
तीरावरी पाहे!सावळासा!!१!!
नामघोष सारा! आसमंतातील!!
जाणी मनातील! पांडूरंग!!२!!
इहलोकी देवा! नित्य राहो माया!!
छत्र कृपाछाया! सदोदित!!३!!
पंढरीची वारी! रंगली फुगडी!!
भक्तीची सुगडी!चरणाशी!!४!!
मनःशांती लाभते! तुझ्या सहवासी!!
झालो स्वर्गवासी! भाग्यवान!!५!!
जयश्री उत्तरेश्वर औताडे,
गंगाखेड, जि. परभणी