लेखक मराठी कविता Marathi Kavita, Poem

सोनुताई रामलाल रसाळ लिखित मराठी कविता लेखक

लेखक मराठी कविता  Marathi Kavita, Poem

लेखक होणे नाही सोपे रे साधन
मनात शब्दांचे नुसते उठते वावधन

बसता एकांती विचारांचा येतो पूर
होऊन सावध घेतो ओंझळ भरून

चलचित्र फिरावे जैसे दिसे शब्दगंगा
मग अमृताची गोडी येत असे अभंगा

इतिहास आठऊनी दाखवी वर्तमानी
पिढ्यान् पिढ्यांचा स्रोत उतरवितो मनोमनी

दावितासे ब्रम्हज्ञान करुनी उत्तुंग लिखान 
वाल्याचा झाला वाल्मिकी लिहून रामायण

कधी करणार नाही तो 'स्व' हिताचे लेखन
समाजाचा होतो आरसा जगवितो स्वाभिमान

लेखका जैसा धनी नाही तिन्ही जगात
करुनी लेखणीस माध्यम रक्षी दिनरात

अन्याय सहन करुनी वैकुंठ आणले भूवरी
वय वर्ष अवघे सोळा लिहूनी संत ज्ञानेश्वरी

काय वर्णावे लेखकाचे कसे असते आत्मचरित्र
कोऱ्या कागदावर सत्त्याचे सामर्थ्य दावी अहोरात्र

लेखका कैसी आण बाण शान
लिखान हेचि त्याचे जीव की प्राण

जगी या सर्वात भावनिक असतो तोचि 
जानूनी घेतले भूतलावर सर्वांनी हेचि

सोनुताई रामलाल रसाळ,
कापूसवाडगाव, ता. वैजापूर