बा विठ्ठला मराठी कविता - Marathi Kavita

सोनूताई रसाळ यांनी लिहलेली कविता बा विठ्ठला या कविता मध्ये कवियत्रीने विठ्ठलाचे वर्णन केले आहे.

बा विठ्ठला मराठी कविता - Marathi Kavita

देह त्यागुनी मज वैकुंठासी ने रे! बा विठ्ठला, 
संसार विकल्प बहु अवघड,
देहा वरी प्रेम माझे उगाच लटके,
आत्म्यास सोसवेना तुझ्या विरहाचे चटके

वैकुंठवासी उभा विठू सदा विटेवर, 
चंद्रभागा नीर वाहे नितळ झरझर,
अंगी नेसलासी पिवळे पितांबर,
गळा शोभूनी दिसती तुळशीहार

गळाभेठ नाही आपली कित्येक शतके,
भोळा मी भक्त तुझा वस्र माझे फाटके,
लाजिरवाणा जीव माझा मोहात गुंतला,
चरणावरी तुझ्या माझा शीनभार हरपला

दर्शनाने देवा तुझ्या पाप माझे जळाले,
रूप तुझे पाहूनी राया मी स्वर्ग मिळविले,
चित्त मनी आठवूनी हृदयात पूर आला,
पांडुरंग पांडुरंग म्हणता भाग्य वीणाटला

"साथ तुझी देवा पाहिजे जन्मभर,
तुझा विसर मनाला ना पाडवा कणभर"


   
सोनूताई रसाळ, कापूसवाडगाव,  वैजापूर