बाप मराठी कविता Marathi Kavita, Poem

संदीप प्रभाकर कुलकर्णी लिखित एक हृदयस्पर्शी मराठी कविता बाप.

बाप मराठी कविता Marathi Kavita, Poem

लेकरांच्या भविष्यासाठी
तो रात्र रात्र झोपत नाही, 
तरी असं का म्हणतात 
बाप प्रेम करत नाही...

मुलामुलींच्या भल्यासाठी 
तो कशाचीही पर्वा करत नाही,
तरी असं का म्हणतात
बाप प्रेम करत नाही... 

तोच शर्ट, तीच पँट घालतो पुन्हा पुन्हा
स्वतःसाठी तो कधीच काही घेत नाही,
तरी असं का म्हणतात
बाप प्रेम करत नाही...

गरजा आमच्या संपत नाहीत
हा पण कधी नाही म्हणत नाही,
तरी असं का म्हणतात
बाप प्रेम करत नाही...

हळव्या मनाचा पण कठोर वाणीचा,
मुलांसाठी झगडणारा,
काटेरी फणसासारखा हा बाप...
दादा म्हणा, बाबा म्हणा की पप्पा...
खरंच...
बाप कधीच कोणाला कळत नाही...
कधीच कोणाला कळत नाही...!

Sandeep Kulkarni

संदीप प्रभाकर कुलकर्णी, औरंगाबाद. 
मो. 9850826679