हलाखीच्या परिस्थितीत
कठीण दिवस काढतो
कुटुंबाच्या रक्षणासाठी
रात्रंदिवस कष्ट करतो
सगळ्यांच्या सुखासाठी
सतत धडपड करत राहतो
शिखरे उत्कर्षाची गाठण्यास
दुःखाच्या झळा सहन करतो
बायकोचे सतत रागावणे
मुकाट्याने सहन करतो
मुलांच्या आनंदासाठी
बळच खोटं खोटं हसतो
समाजाने केलेल्या टीका
हसत हसत स्वीकारतो
पैशांची गरज भागवण्या
मिळेल ते काम करतो
मुलीच्या लग्न मोठ करायचं
एकच स्वप्न उराशी बाळगतो
वेळप्रसंगी मग मुलीसाठी
पोटच्या मुलाला वगळतो
मुलाला चांगल कॉलेज मिळावं
कुठेही जाऊन तळवे झिजवतो
मुलाच्या उज्वल भविष्यासाठी
पैशांची बांधणी करत असतो
पाहुण्यांच्या लग्न समारंभाला
आवर्जून उपस्थित राहतो
कुणी आकस्मिक मरण पावले
सर्वांच्या आधी हजेरी लावतो
आलाच खूप राग कधी तर
मुकाट्याने सहन करत असतो
रुसवे फुगवे मनात न ठेवता
सगळ्यांशी कायम प्रेमाने वागतो
दगडाच्या काळजाचा माणूस
अतिशय हळवा देखील असतो
आपल्या बापासारखा माणूस
जगात शोधूनही सापडत नसतो
सौ. प्रिती सुरज भालेराव