बाल गोपाल मराठी कविता - Marathi Kavita

कु. कावेरी आबासाहेब गायके लिखित गोकुळाष्टमी चे वर्णन करणारी कविता बाल गोपाल

बाल गोपाल मराठी कविता - Marathi Kavita

शोभे कपाळी सुगंधी चंदन
चरणावरी तुझ्या पवित्र धाम, 
देवकीचा तान्हा, यशोदेचा कान्हा
सावळा, नटखट राधेश्याम... 

बासरीची धून, शोभे मयुरपंख
पालनकर्ता, गोपीकांचा लडिवाळ, 
सुदर्शन चक्र घेतले हाती
येतो जवळ दुष्टांचा काळ... 

दह्या, दुधाचे फोडून माठ
गोपीकांची काढी छेड, 
मित्रांचा पाठीराखा, प्राणसखा
लिला दाऊनी काढी खोड... 

प्रेमाची परिभाषा शिकवली 
राधेला होता तुझाच ध्यास, 
दिव्य, मनमोहक तुझे रूप
मित्र प्रेमाचा तू श्वास... 

कु. कावेरी आबासाहेब गायके,
भिवगाव, ता. वैजापूर,
जि. औरंगाबाद.