अंगणातल्या तुळशीला
पाणी मी घालते
रोज मनोभावाने
तिची पुजा करते
सकल विश्वामध्ये
पवित्र तुळस असते
तिच्याशिवाय शुध्द
जगी कुणीच नसते
तुळशीपुढे दिवा
नित्यनेमाने लावते
अखंड सौभाग्याचे
दान मी मागते
करता तुळशी पूजन
भय सगळे पळून जाते
सुख समाधानाने जसे
घर उजळून निघते
तुळशीचा स्पर्श
दोष हरून जाती
अक्षय समृद्धीची
होईल प्राप्ती
सौ. प्रिती भालेराव, पुणे