किती जरी आली मेघ
नाही डगमगायचे
पंख करूनी स्थिर
उंच उंच उडायचे
खेळ दिवस रात्रीचा
तेज सूर्याचे घ्यायचे
सरीमध्ये पावसाच्या
मनसोक्त भिजायचे
येता चैत्र पालवी
रान हिरवे व्हायचे
बीज होऊन मातीत
येता सरी उगायचे
आले जरी किती वारे
हात हाती द्यायचे
नाते जोडून धरेशी
डर सारे जिंकायचे
तम करण्यास दूर
वाती सम जळायचे
देण्या सुगंध जगास
फुलासम फुलायचे
पुनम सुलाने
हैदराबाद