बाय बाय 2021 ! Welcome New Year 2022

संदीप प्रभाकर कुलकर्णी यांनी लिहिलेली बाय बाय 2021...! Welcome New Year 2022 कविता

बाय बाय 2021 ! Welcome New Year 2022

बरंच काही शिकवलं तू
माझ्या मित्रा ट2021
सारंकाही विसरून आता
नव्या वर्षात नव्या जोमानं 
ओढून आणू सुखाचे क्षण...!

येतानाच तू सोबत आणलं 
वेव्हज अन्  लाटांचं दडपण
खरचटलो, मंदावलो आम्ही
जरी थोडेसे काही वेळ 
उठलो पुन्हा, तरी पण...!

तूच दाखवलीस मित्रा,
जॉब गमावल्यानंतर
होणारी पैशाची चणचण
वितभर या पोटासाठी 
करावी लागलेली वणवण...! 

गाऱ्हाणं नाही सांगत तुझं,
तुझी चूक नाही रे मित्रा...
माझ्या मनातलं सांगतोय
निरोप देताना आज तुला 
क्षण न क्षण आठवतोय...!

भीती होती मनात आमच्या
निराकार आणि निराधार 
हटलो नाही, हरलो नाही
हिमतीनं आणि उमेदीनं
परतवून लावले सारे वार...!

जगायचं कसं आनंदानं,
जपायची कशी नातीगोती,
फुलवायचं कसं आपसात प्रेम
मित्रा शिकवलंस तू...!
बाय बाय 2021..! वेलकम  2022...!
नूतन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...! 

Welcome New Year 2022

Sandeep Kulkarni

संदीप प्रभाकर कुलकर्णी, औरंगाबाद.