कोरोना मराठी कविता Marathi Kavita, Poem

प्रिती सुरज भालेराव लिखित मराठी कविता कोरोना यामध्ये कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थिति चे वर्णन केले आहे.

कोरोना मराठी कविता  Marathi Kavita, Poem

आली कुठून कशी ही महावारी
माणसांना केलं तिने हैराण
रोजचं जगणं केलं मुश्कील
माणूस झाला खूप परेशान

घराबाहेर पडताना नेहमी
मास्क लावून पडावं लागतं
जे काही चालू आहे सध्या 
उघड्या डोळ्यांनी पहावं लागतं

अगणित लोकांना हिने पिडलं
बऱ्याच जणांना कोरोना झाला
सहन करणं खूप कठीण झालं
नात्यांमध्ये केवळ दुरावा आला

दुरवर ऐकली बातमी तोवर ठीक
कोरोना आपल्या घरात आला
त्रास होतोय जवळच्या व्यक्तींना
खरा काय रोग आहे तो कळला

आपलीच माणसं आपल्याला
परकेपणा दाखवू लागली
दवाखान्यात ऍडमिट केलं
कुणीच कुणाला नाही भेटली

एक डोस खरचं काय असतो
खरी किंमत तेव्हा त्याची कळली
होणारा त्रास सहन केला खूप
मिळण्यास इंजेक्शन तळमळली

अनेकांचा त्रास पाहू वाटत नव्हता
दुःख आणि तळमळ खूप वाटली
स्मशान भुमीत प्रेतांच्या राशी
सगळी दुनिया जशी हळहळली

सौ. प्रिती भालेराव, पुणे