चाहूल तुझ्या येण्याची
मला आता लागली
तुझ्या आगमनाची
पूर्ण तयारी झाली
हे गणपती बाप्पा तू
सकल देवांचा नायक
संकटातून सोडविशी
तुच विश्वाचा चालक
तुझ्या चतुर्थीचा उपवास
मनोभावे मी करते
तुझ्या चरणांसी माझा
देहभाव मी अर्पिते
सुखकर्ता आहेस तू
भालचंद्र ही असशी
भक्तांच्या विघ्नांचा
नाश तूच करशी
तुझ्या पूजनात असते
दुर्वांना महत्त्व विशेष
कुणी म्हणती गजानना
म्हणती कुणी गणेश
कार्यक्रमाच्या सुरुवातीला
असते तुझीच गणेशवंदना
वर्णू कशी ख्याती तुझी
तुझ म्हणती गौरीनंदना
सौ. प्रिती सुरज भालेराव, पुणे