चंद्रयान 3 - महान भारत देश

सौ. अमिता अरविंदराव घाटोळ लिखित मराठी कविता चंद्रयान 3 - महान भारत देश

चंद्रयान 3 - महान भारत देश

यशवंत यशोगाथा
इतिहासात अजरामर ।
भारतीय शास्त्रज्ञांचे
परिश्रमाने स्वप्न साकार ॥१॥

विज्ञान तंत्रज्ञानाचा
जणू उत्तुंग अविष्कार ।
अंतराळी चंद्रयान तीन
भारताचा जयजयकार ॥२॥

बुद्धिमत्ता सातत्य संयमाने
स्त्रिया पुरुषांनी घेतला भार ।
शैक्षणिक प्रगती उंच भरारी
तिरंगा झेंडा फडकला चंद्रावर ॥३॥

शास्त्रज्ञानाचे हार्दिक अभिनंदन
प्रयत्नांनी पराकाष्टाने मिळे पुरस्कार ।
भारत देश माझा महान
विश्वात लौकीक कार्य साकार ॥४॥

Amita Ghatole

सौ. अमिता अरविंदराव घाटोळ,
अकोला