आयुष्य नावाच्या कोळ्याने
विणून ठेवलय जगणे नावाचे
सुंदर मोहक फसवेसे जाळ
घेते खेचूनी भक्ष्यास हे जाळे
अलगद फसता माणूस स्वतः
घेते त्यास लपेटुनी हे जाळे
भ्रमात असतो तो सुटकेच्या
नाही सोडत त्याला हे जाळे
मोह, आकर्षण, लालसा सारे
असते मनात ज्याच्या ज्याच्या
हे रेशीम जाळे त्यास खुणावते
कळे परी ना वळे असे असते
वरलिया रंगा भुले मन भोळे
बेगडी वैभवास भुलती डोळे
शेवटी मन चंचल माणसांचे
नाही टाळू शकत मोहक जाळे
अरुण वि. देशपांडे-पुणे
9850177342