चुरगळली जाते कळी आजही
वासनांधाच्या नजरेखाली
का तिला असाह्य वेदना
का तर म्हणे सुंदर साली।।१।।
सजने सवर म्हणजे नखरा
आजही बनते बळीचा बकरा
किती केलं पाप तरी
मुक्तपणे फिरतो छोकरा ।।२।।
निर्लज्ज पापी चरीत्रहीन म्हणून
तिच्याच माथी खापर फुटतं
हे बिन आळ्याच जनावर मात्र
बोकडासारखं माजतं सुटतं ।।३।।
व्हावी आता तिच्या वेदनेची कदर
आई बहीण म्हणून व्हावा आदर
अरे एकदा जीव लावून तर बघ
तुझ्या सुखासाठी जीवनभर
देवासमोर पसरेल ती पदर ।।४।।
सौ. शशिकला गुंजाळ,
वांगी, भुम, जि. उस्मानाबाद