रंग आठवणींचा

अजय दत्तात्रय चव्हाण लिखित मराठी कविता रंग आठवणींचा

रंग आठवणींचा

आठवणीतच रंगलो होतो आज
साजरी करताना होळी
पिचकारीतूनही सुटत होती 
जशी बंदुकीची गोळी

आठवणींच्या रंगापुढे 
फिके रंग सारे
रंगून देखील रंगात
मुके अंग सारे

या मूक अंगास आता
सहवासाचा हवा रंग
हवाहवासा वाटतो मनास
प्रत्येक भेटीचा नवा रंग

चित्रकार अशी तू
रंग भरले जीवनात 
रंगापलीकडच्या ही शुभेच्छा तुला
छायाचित्र कोरले हृदयात

Ajay Datratay Chavan

अजय दत्तात्रय चव्हाण
पोलीस उपनिरीक्षक, गडचिरोली
(खाकी वर्दीतील दर्दी कवी)