गोरी राधा भुलली
सावळ्याच्या शामरंगा
शतकानंतरही चढली
लाली जीवनी प्रेमरंगा
प्रेमरंगी मी रंगले सख्यारे
लागले सप्तसूर छेडायला
भावनाही एकमेकांची होवुनी
सावली लागली गुंतायला
सप्तरंगी मन माझे
सप्तरंगी भाव मांडते
सप्तरंगी इंद्रधनू जणू
मनमंदीरात उमलते
निराशेचा रंग काळा
ना कधी जीवनी यावा
सुखदुःखाच्या आयुष्यात
हात तुझा हाती हवा.
सप्तरंगी मन हे झाले
सख्या तुझ्या सहवासात
सहजीवनात मिळता गोडी
रमले साजना तुझ्या विश्वात.
सौ. अश्विनी सागर मेहता,
महाराष्ट्र पोलिस, पुणे