रंगात रंगण्या तुझ्या
वाट किती पाहिली
अचानक प्रेमाने तुझ्या
काया माझी न्हाहली
असा रंग तुझा
सुखावून गेला
जसा प्रभूश्रीराम
भुवरी अवतरला...
रंग पाहीले अनेक
तुझा रंग वेगळा
रंगात तुझ्या न्हाऊन
मन झाले आगळे
रंगीबेरंगी दुनियेत
भेटतो रंग बदलणारा
तुझाच एक रंग असा
कधी न बदलणारा...
बाबा चन्ने,
धोंदलगाव, ता. वैजापूर