आम्हा भारतीयांचा अभिमान
श्वासाइतके प्रिय हे असे,
विश्वचषक स्पर्धा म्हणजे
देशप्रेमाचे प्रात्यक्षिक दिसे...
ऑस्ट्रेलिया नी भारत मॅच
फायनलची अशी रंगली,
हर एक देशवासीयांच्या
घरातली जणू झाली...
भारताचा खेळाडू घरचाच
जणू वाटत होता,
श्वास रोखून, तहान - भूक हरपून
भाऊकपने दाद देत होता.
एकरूप आम्ही आमच्या
प्रत्येक चेंडूशी झालो,
देशप्रेम उफाळून आपसूक
त्यात आकंठ बुडालो...
आपला देश जिंकावा
हीच मनोमनी आशा,
प्रत्येक षटकाराच्यावेळी
मनी विजयाची भाषा...
श्वास रोखून शेवटचे क्षण
जो, तो ईश प्रार्थना करत होता,
माझा देश वर्ल्ड कप
जिंकलेला पाहायचा होता...
शेवटी हार जीत होतच असते
पण देशप्रेमाने भारलेली मने
आज एकरूप दिसली,
आणि क्रिकेटच्या निमित्ताने
पुन्हा देशप्रेमाची ज्योत
पेटताना हसली...
जया विनायक घुगे - मुंडे
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षिका
गावंदरा परळी वैजनाथ, बीड