पाहता तुला रे
पडते शब्द तोकडे
तुझा अबोला असा
करतो हृदयाचे तुकडे
तुलाच जमते रुसने
अन् मला सारखे तुला मनविने
तू मात्र भासतो दयाहीन
अन् मी जागते तुझाचसाठी रात्रंदिन
का? कुणास ठाऊक तुला
सुख वाटते छळन्यास मला
मी मात्र एकटी हळहळते
आणि देह यातनांनी आठवते तुला
बघ एकदा दे आवाज मला
नियतीही देईल साथ तुला
अबोल्यात कसले जगणे आले
दे थोडे शब्दांचे दान मला
होईल विचारांची बैठक रोज
मिळेल तितकं जगून घे आज
उद्यावर नको सोडू कामकाज
हसून वाट चालण्यातच आहे राज
बनावटीच्या सगळ्या दुनियेत
नाहीच दुसरे कोणी खास
तू मला आणि मी तुला समजावे
नाहीच दुसरी काही आस
सोनाली रामलाल रसाळ,
कापूसवाडगाव,
ता. वैजापूर, जि. औरंगाबाद