धाव धाव रे विठ्ठला...

समाजातील भिषण परिस्थिती पाहता विठ्ठलाचा धावा करणारा भक्त जयश्री जगताप यांच्या कवितेतून दिसून येतो

धाव धाव रे विठ्ठला...

धाव धाव रे विठ्ठला
 सोड आता रे ती वीट
 कर मानव जन्माची
 घडी सावळ्या तू नीट

 धीचेच प्रश्न सारे
 हुंडाबंदी, भ्रूणहत्या
 सोडविण्या काढ कर
 थांबव बा आत्महत्या...

 जग आज थांबले रे
 पाहे डोळे उघडून
 आत्मा एकेक चालला
 आम्हां सर्वांना सोडून

 त्रासलेत तुझे भक्त
 तरी आलेत पंढरी
 नको रागावू आम्हांस
 चुकलीच गत वारी

 तुच रे  आमचा बाप
 तुच आमुची माऊली
 संकटातूनी वाचण्या
 दे तू भक्तांना सावली

jayshri Avinash jagtap

सौ. जयश्री अविनाश जगताप,
 सातारा