धुयमाती Marathi Poem

वासुदेव महादेवराव खोपडे लिखित मराठी कविता धुयमाती

धुयमाती Marathi Poem

धुयमातीच्या दिवसी
रंग रंगोली म्या साई
अशी कशी होई म्हणे
दाजी अशी कशी होई !!

लाडू समजून खाल्ली
तीन भांगाची हो गोई
गोळ गोळ मांगे साई
मांगे पुरणाची पोई !!

थयथय नाचे साई
गळा घालून चाकोल्या
माकड ऊड्या मारून
मले दाखवे वाकुल्या !!

केला जीवाचा खकाना
लई रंगात आली साई
रंग रंगात रंगून
साई करे चुईमुई !!

म्हणे रंग नोका चोळू
तंग झाली माही चोई
अशी कशी होई म्हणे
दाजी अशी कशी  होई !!

अशी झाली माही औदा
राज्या साई संग होई
मन पावित्र्याची खाण
साई माही साधी भोई !!

Vasudev Mahadeorao Khopade

वासुदेव महादेवराव खोपडे,
सहा. पोलीस उपनिरीक्षक (सेनि)
अकोला