दुःखाशी संवाद मराठी कविता Marathi Kavita, Poem

दुःखाशी संवाद कसा करावा या आशयाची बाबा चन्ने लिखीत कविता "दुःखाशी संवाद"

दुःखाशी संवाद मराठी कविता Marathi Kavita, Poem

दुःखात हो तुमच्या
मला ही सामावून घ्या
दुःखाची तुमची जागा
थोडीशी मला ही द्या.

संवाद सुखाचा 
असतो सुखाशीच 
दुःखाचा मात्र संवाद 
असतो दुःखाशीच

कित्येक वर्षाचे दुःख 
साचले असेल मनात 
संवाद करा माझ्याशी
मन रिते होईल क्षणात 

घुसमट तुमची बघून
डोळे माझे पाणवतात
दुःखाचा विचार केला की
वेदना तुमच्या जाणवतात 

माझ्याकडून कधीही
होणार नाही निराशा 
चेहऱ्यावर फुलावे हास्य 
हीच आहे एक आशा

बाबा चन्ने, धोंदलगाव, ता. वैजापूर