एक चिमणी

सौ. जयश्री अर्जुन मुंडे लिखित मराठी कविता एक चिमणी

एक चिमणी

एक चिमणी बसे एकटी
तीच खिडकी तीच फांदी

एक चिमणी राही उदास
उडून गेला तिचा चिमणा खास

पिल्ले दोन ती पंख फुटता 
गेली उडून नव्या जगात

चिमणी राही मग एकटी
पिल्ले येण्याची वाट पहात

पिल्ले गुंगली विश्वात त्यांच्या
आठवली ना चिमणी त्यांना

चिमणी होती चतुर फार
केले दाणे ते गोळा हो चार

पेरले ते हो नेवून शेतात
आला पाऊस फुटला कोंब

झाली रे वाढ त्याच बियांची
आली त्यांना ती अनेक कणसे

चरायला ते येती पाखरे
दावी चिमणी त्यांना नखरे

झाली मैत्रीण तीच चिमणी
गेले दिवस ते आनंदाने

रोज चिमण्या येती भेटाया
शेती कामाचं घेती शिकाया

तीच कुढण झालं ते बंद
शेतीच वाटे आनंदी छंद

Jayshri Munde

सौ. जयश्री अर्जुन मुंडे
अंबाजोगाई