दहा दिवस बाप्पा तुझा पाहुणचार केला
नको असणारा तो विसर्जनाचा दिवस उगवला
तू खरचं निघालास का रे बाप्पा विश्वास माझा बसेना
किती समजावू माझ्या मनाला काही केल्या ते ऐकेना
सूने होईल घर हे माझे तुझा निरोप घेता रे
क्षणा क्षणाला ओठांवर तुझाच नामघोष रे
तुझ्या आवडीचे मोदक मी केले तुला निरोप देण्यासाठी
प्रतिक्षा करेल मी आता बाप्पा वर्षभर तुझ्या येण्यासाठी
यावर्षी तुझ्या आगमनाला ढोल ताशांच्या गजर नाही झाला
तू घरोघरी येऊन आम्हाला आशिर्वाद मात्र दिला
यंदा तुझ्या विसर्जनाची मिरवणूक साधीच काढण्यात आली
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळयांनी नियमावली पाळली
घराबाहेर पडताना मास्क आणि सेनी टायझर वापरुया
योग्य काळजी घेऊनच लाडक्या बाप्पाला निरोप देऊया.
सगळे मिळून चला आपण बाप्पाला निरोप देऊया
गणपती बाप्पा मोरया पुढच्यावर्षी लवकर या
सौ. प्रिती भालेराव, पुणे