शेतकरी माझा बाप मराठी कविता - Marathi Kavita

गिरीष सैंन्दोरे शेतकरी वाडिलांवर लिखित मराठी कविता शेतकरी माझा बाप...

 शेतकरी माझा बाप मराठी कविता - Marathi Kavita

सणवार नाही त्यास सर्व दिवस समान,
मुलांच्या शिक्षणासाठी गाळतो घाम ;
खातो कष्ठाची चटणी भाकर,
ऐका झोपडीत नांदीतो संसार, 
तो शेतकरी माझा बाप.

शेतात हाकवूनी नांगर,
पिकासाठी घेतो कर्जाचा भार, 
दुष्काळावर करून मात,
पिकवतो हिरवेगार रान,
ऊन-वारा याच नाही त्यास भान,
तो शेतकरी माझा बाप.

दिवस-रात्र शेतात राबून,
पिकवतो शेतात धान्य,
सरकारने योग्य भाव न देऊन,
भागवतो जनतेच्या गरजा,
अशा या माझ्या शेतकरी बापाला
मानाचा मुजरा... मनाचा मुजरा....

गिरीष सैंन्दोरे