तिरंगा नव्हे पाच रंग

सौ. करिश्मा महेश डोंगरे लिखित मराठी कविता तिरंगा नव्हे पाच रंग

तिरंगा नव्हे पाच रंग

ताठ मानेने उभा असतो
नेहमी चमकत राहतो
वाऱ्याच्या दिशेने कसा
सुंदर तो फडकत असतो.

पाच रंग त्याचे छान
केसरी असतो धैर्याचा
जवान लढतो सिमेवरी
रंग लेऊनी त्यागाचा.

दुसरा रंग तो पांढरा
मार्ग दाखवि सत्याचा
आंधराकडून प्रकाशाकडे
भासतो जसा पावित्र्याचा.

तिसरा रंग तो हिरवा
मनात असलेल्या निष्ठेचा
पसरलेल्या समृद्धीचा
नेसलेल्या हिरवळीचा.

चौथा रंग म्हणजे निळा
प्रगतीच्या गतीमानतेचा
पाचवा रंग हा लाल
सैनिकाच्या बलिदानाचा

असा शोभतो पंचरंगी
महान असा हा तिरंगा 
लाल रंगाने रंगतो कधी
महान असा हा तिरंगा.

Karisma Dongare

सौ. करिश्मा महेश डोंगरे
पंढरपूर