दरवळून सुगंध
दिशा दिशांत जातो
अंगणात माझ्या
जेव्हा मोगरा खुलतो
मन होऊन गुलाबी
बेधुंद होते
अंगणात गुलाबाची
कळी छोटीशी उमलते
एक नव्या वेगळ्या
रंगात जीवन रंगते
विविध फुलांच्या रंगाने
बाग माझी बहरते
ऋतू फुलांचा जीवनात
प्रत्येकांच्या येत राहो
आयुष्याच्या वळणावरती
गंध फुलांचा दरवळत राहो
पूनम सुलाने, हैदराबाद