फुले मराठी कविता

कु. शिवानी चंद्रकांत खोकले लिखित मराठी कविता फुले

फुले मराठी कविता

निसर्गाचा सुंदर भाग आहे फुले,
आवड करतात त्याची सर्व मुले ॥धृ॥

फुलांमुळे पृथ्वी दिसते आकर्षित,
त्यांच्यामुळे जग होते सुगंधित ॥१॥

फुले आहे पृथ्वीवरचे तारे,
त्यांना बघून होते मन तृप्त सारे ॥२॥

मला वाटते खास आहे मोगरा,
कारण तो लग्नसमारंभ करतो साजरा. ॥३॥
 
कमळाचे फूल आहे खूप मोठे
ते सहज पाहायला मिळत नाही कुठे ॥४॥

पारिजातकाच्या फुलांच्या सड्याचा पहाटे येतो सुवास,
कारण ते स्वर्गातून पृथ्वीवर आले आहे खास ॥५॥

ब्रह्मकमळ आहे खूप पवित्र,
मनातील इच्छा पूर्ण करते मात्र ॥६॥

बदलतात सूर्याची दिशा जे फुलं,
त्यांचे नाव आहे सूर्यफूल ॥७॥

Shivani Khokhale

कु. शिवानी चंद्रकांत खोकले,
    (इयत्ता नववी)
न्यू इंग्लिश स्कूल उंदिरवाडी,
ता. येवला, जि. नाशिक