पूर्णविराम मराठी कविता Marathi Kavita, Poem

सौ. प्रिती सुरज भालेराव लिखित पूर्णविराम मराठी कविता यामध्ये प्रेमभाव व्यक्त केला आहे

पूर्णविराम मराठी कविता Marathi Kavita, Poem

रात्रंदिवस तुझ्यासाठी
देह माझा जाळला
माझ्या प्रेमाचा तुला
अर्थच नाही कळला

देहाचं काय करावं रे
मन माझं जळत आहे
वर्षानुवर्ष सतत ते अस
तुझीच वाट पाहत आहे

तुझ्या बोलण्यातला तो
सूर मला जाणवत होता
नकळतपणे काळजावर
घाव जोरात घालत होता

शरीरावरच्या जखमा तरी
आज उदया भरुन येतात
मनावर झालेल्या जखमा
आयुष्यभर दुःखच देतात

तुझ माझ्यावर चिडण
हे स्वाभाविक असेल रे
सहन करून आता हे सार
माझी सहनशक्ती संपली रे

प्रेम करायचं न्हवत तुला
खोटी आशा का दाखवली
किनारा पार करण्याआधीच
नौका पाण्यामधे कशी बुडली

संपवूनि खेळ सारा
श्वास मोकळा घ्यावा
आयुष्याच्या प्रवासाला
पूर्णविराम द्यावा

सौ. प्रिती भालेराव