गौराई आली घरा मराठी कविता Marathi Kavita, Poem

सौ. प्रिती सुरज भालेराव लिखित गौराई आली घरा मराठी कविता यामध्ये देवी गौराई चे वर्णन व आगमनाचा आनंद व्यक्त केला आहे

गौराई आली घरा मराठी कविता Marathi Kavita, Poem

सोन्याच्या पावलांनी
गौराई आली घरा
सुखाची किरणे जशी
घेऊनी आली दारा

ज्येष्ठ आणि कनिष्ठ
रूपे तुझी बहु गोड
भक्तांच्या भक्तीची
आहे तुला आवड

तुझ्या आगमनाने घरी
चैतन्याचा झरा वाहतो
धूप, दीप, नैवेद्य, आरती,
सुगंध जसा दरवळतो

तीन दिवसांची पाहुणी
माहेराला येते
भक्तांच्या मनोकामना
पूर्ण ती करते

तुझ्या आवडीचे
फराळ मी केले
शुध्द तुपामध्ये
लाडू मी वळले

तुझी पुजा मी करते
मनोभावे उपासना
पूर्ण कर हे माते
माझी मनोकामना

सौ. प्रिती सुरज भालेराव, पुणे