गुण विठोबाचे

विठ्ठलाच्या गुणाचे वर्णन करणारी जया मुंडे लिखित कविता "गुण विठ्ठलाचे"

गुण विठोबाचे

परब्रम्ह रूप! स्कंद पुराणात
ध्यान भजनात! माऊलीच्या!!धृ!!

कटावरी हात!ठेविलेस देवा
सुखमयी ठेवा! अंतरंगी!!१!!

कौस्तुभाचे मणी! कंठी शोभतात
रूप दावितात! सत्वगुणी!!२!!

मस्तकी शंकर! नित्य स्थानापन्न
शिवास धारण! शिवलिंग!!३!!

मूर्ती ध्यान छान ! स्पर्शितो भाविक 
नसे उच-नीच! भक्तीभाव!!४!!

भूलोकीचे तीर्थ! वैकुंठ तीधाम
वारी फळलाभ! मोक्षप्राप्ती!!५!!
 
चराचर नसे! तेव्हा पंढरपूर
भूलोकीचे स्वर! चारधाम!!६!!


श्रीम. जया विनायक घुगे-मुंडे
जिल्हा परिषद शिक्षिका,
गावंदरा, परळी (वै.), बीड.