गुरु चंद्राची शीतलता,
गुरु अग्नीची दाहकता,
गुरु धरतीची ममता,
गुरु निराची व्याकुळता,
गुरु सूर्याचा प्रकाश,
गुरु अथांग आकाश,
गुरु मायेची साऊली,
गुरु अनाथांची माऊली,
गुरु आसमन्त खुला,
गुरु आनंदाचा झुला,
गुरु मनाला आधार,
गुरु संकटाचा स्वीकार,
गुरु प्रेम,
गुरु आपुलकी,
गुरु ज्ञान,
गुरु चिंतामणी,
गुरु विश्वास,
गुरु सारथी,
गुरु आत्मज्ञान,
गुरु धरती,
गुरु माय,
गुरु समाधान,
गुरु आनंद,
गुरु हदयात स्थान,
गुरु आई,
गुरु बाप,
गुरु सुख,
गुरु अखंड जाप,
गुरु कल्पवृक्ष,
गुरु देवत्व,
गुरु सारथी,
गुरु सर्वस्व,
गुरुविण नाही जग,
गुरुविण समाधान,
गुरुविण नाही प्राण,
गुरु पूर्णत्वाची जाण
श्री. जयश्री उत्तरेश्वर औताडे,
गंगाखेड, जि. परभणी