गुरुमहिमा Marathi Kavita

सौ. विजेता चन्नेकर लिखित मराठी कविता गुरुमहिमा

गुरुमहिमा Marathi Kavita

गुरु अथांग सागर
दिव्य ज्ञानाची घागर
गुरू‌ संगीत जीवनी
गुरू‌ विणेची झंकार

गुरु ‌वाऱ्याची झुळूक
गुरू ‌उन्हात सावली
सान जीवास आधार
गुरु वात्सल्य माऊली

गुरु ‌देहातील श्वास
निल विस्तिर्ण आकाश
गंधहिन आयुष्यात
पसरवी‌ तो सुवास

तेज दैदिप्यमान ते
तेजोमय रवितारा
अंधारल्या ‌आयुष्याला
 देई‌ उजेडी किनारा

जीवनाचा‌‌ तो सुकानु
लावी पैलतीरी‌ होडी
ज्ञान विज्ञानाची‌ बाळा
करी निर्माण हो गोडी

गुरु ‌आशिष मिळता
काय जीवनात‌ कमी
ऐशा गुरूस वंदन
सदा नतमस्तक ‌मी

सौ. विजेता चन्नेकर, गोंदिया